Skip to Content

Gold Saving Scheme

अटी व शर्ती

  1. योजनेचा उद्देश: भविष्यकाळात RL Jewels कडून दागिने खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम भरण्यासाठी हि योजना तयार करण्यात आलेली आहे.
  2. योजनेचा कालावधी: योजनेचा कालावधी ११ महिने असून १२ व्या महिन्याच्या आत (३६० दिवस) दागिन्यांची खरेदी करणे आवश्यक आहे.
  3. हप्ता रक्कमेचा कालावधी: ग्राहकांना ५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जाईल व त्यानंतर उशीरा केलेल्या रकमेच्या पेमेंट होई पर्यंत दररोज ५० रुपये दंड आकारला जाईल व उशीरा रक्कम न भरल्यास योजनेचे लाभ रद्द केले जातील.
  4. मुदत कालावधी तारीख: योजना कालावधीत जमा केलेल्या शेवटच्या किंवा उशिरा केलेल्या रकमेच्या तारखे नुसार  निश्चित केली जाईल.
  5. दागिन्यांची खरेदी: अगाऊ जमा केलेल्या रकमेच्या मोबदल्यात गोल्ड, सिल्वर, डायमंड (उदा. २४ कॅरेट, २२ कॅरेट किंवा डायमंड १८ कॅरेट) दागिन्यांचीच खरेदी करता येईल. 
  6. योजनेचा परतावा: योजनेत जमा झालेली रक्कम परत मिळनार नाही व कोणत्याही प्रकारची विनंती प्रक्रिया केली जाणार नाही तसेच सदर रक्कम ही दागिने खरेदीसाठीच आहे.
  7. योजनेचे पालन: सदर योजनेचा कालावधी ३६५ दिवसांचा असून या कालावधीत योजनेचे पालन न झाल्यास योजनेचे फायदे गमवावे लागतील.
  8. पावती: योजनेच्या प्रत्येक ठेवीसाठी एक पावती दिली जाईल जी आगाऊ पेमेंट म्हणून गृहीत धरली जाईल.
  9. किमान ठेवीची रक्कम: ग्राहकांना किमान १,००० रुपये महिना भरणे आवश्यक आहे.
  10. वारसाचे तपशील: योजना आणि त्याचे फायदे हस्तांतरणीय नाहीत परंतु वारस जोडला जाऊ शकतो व वारसदाराचे फोटो व ओळखपत्र जोड़णे आवश्यक आहे.
  11. रकमेचा भरणा: हप्त्याची मासिक रक्कम रोख स्वरूपात (२ लाखा पर्यंत), UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे वा चेक द्वारे केले जाईल, जर चेक बाऊँस झाल्यास ५०० रुपये दंड रोख स्वरूपात द्यावा लागेल.
  12. योजनेत बदल: योजनेत बदल किंवा सुधारणा करण्याचा अधिकार पूर्व सूचना न देता व्यवस्थापनाचा राहील.
  13. कर प्रणाली: योजनेत लागणारे सर्व कर ग्राहकांना लागु असतील.
  14. ग्राहकांची जबाबदारी: वेळेवर पेमेंट करण्याची आणि सर्व शर्तींचे पालन करण्याची जबाबदारी ग्राहकांची राहील.
  15. दस्तऐवज नोंद: जमा केलेल्या रकमेच्या सर्व पावत्या सांभाळण्याची जवाबदारी ग्राहकांची राहील, ज्या कालावधी पूर्ण होते वेळी आवश्यक असतील.
  16. संपर्क संमती: ग्राहक या योजनेत सामील होऊन, RL Jewels कडून SMS, ईमेल, WhatsApp किंवा फोन कॉलद्वारे योजने संबंधित व इतर मार्केटिंग संबंधित माहिती स्वीकारण्याची संमती असेल.
  17. अपवाद: नैसर्गिक आपत्ती, सरकारी प्रतिबंध किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास RL Jewels या शर्तींवर कार्यवाही करण्यास जबाबदार राहणार नाही. 
  18. अटी व शर्ती : योजनेत सामील होऊन आपण येथे दिलेल्या सर्व अटी व शर्ती कोणत्याही आक्षेपा शिवाय मान्य करत आहात. 
  19. कायदेशीर न्यायक्षेत्र: योजनेतून निर्माण होणारे सर्व वाद-विवाद फक्त जळगाव न्यायालयीन कार्य क्षेत्राच्या अधीन.


योजना विशेषता: योजनेचे फायदे अन्य चालू ऑफर्स, प्रचार किंवा सूटसह मिळवता येणार नाहीत, जोपर्यंत RL Jewels कडून स्पष्टपणे नमूद केलेले नाहीत.

सामान्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Beauty without
expression is boring

Join us and enjoy the pleasure of caring for yourself.